(बुद्धांनी अनाथपिंडिकास केलेला उपदेश: अनाथपिंडिक सुदत्ताने बुद्धांना विचारले की, "माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार-उदीम यांचा मी त्याग केलाच पाहिजे काय? आणि धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय?" त्यावर बुद्धांनी त्याला जो उपदेश केला त्याचा हा भाग आहे. )
****************************************************************
परिश्रम करा.
उद्यमशील, उत्साही व कार्यरत रहा
परिश्रम करा.
उद्यमशील, उत्साही व कार्यरत रहा
*
तुमच्या उपजीविकेचे जे काही कार्य असेल, जो व्यवसाय तुम्ही करता त्यात तुम्ही कार्यरत रहा आणि परिश्रमपूर्वक स्वतःला आपल्या व्यवसायकार्यात वाहून घ्या. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाही तर संपत्तीला चिकटून राहण्याची प्रवृत्ती आणि जीवन, सत्ता व संपत्तीची आसक्ती माणसाला गुलाम करते.
आळसाचे जीवन घृणास्पद होय. निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे.
लोक काहीही करोत, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत, किंवा संसारत्याग करून धार्मिक चिंतनात/ध्यान करण्यात ते आपले आयुष्य घालवोत; मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे.
पाण्यात वाढणाऱ्या परंतू पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील; जीवनसंघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील, तर आनंद, शांती, आणि समाधान खात्रीने त्यांच्या मनात वास करतील.
उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग तो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना व सहकाऱ्यांना वरदान ठरतो.
****************************************************************
(संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म )
(संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म )
Namo buddhay ��
ReplyDelete