खन्ति पारमिता- सहनशीलता, संयम, धीर

|| तथागत बुद्धांची शिकवण ||

"खन्ति पारमिता" :  क्षान्ति म्हणजे सहनशीलता, धीर, संयम. 

"द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही; तो फक्त सहनशीलता, धीर व संयमानेच शांत होऊ शकतो."

 "Khanti is forbearance. Not to meet hatred by hatred is the essence of it. For hatred is not appeased by hatred. It is appeased only by forbearance."

~ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कुशल कर्म करा

|| तथागत बुद्धांची शिकवण ||
************************
"कुशल कर्म करा"

"कुशल कर्म करा, म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कम्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कम्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी, त्रस्त होते."

Therefore, the Buddha's admonition was: "Do Kusala Kamma so that humanity may benefit by a good moral order which a Kusala Kamma helps to sustain; do not do Akusala Kamma, for humanity will  suffer from the bad moral order which an Akusala Kamma will bring about."

~भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
********************

असत्य न बोलणे व व्यर्थ बडबड न करणे

|| तथागत बुद्धांची शिकवण ||
************************
"असत्य न बोलणे... आणि व्यर्थ बडबड न करणे."

('वाकशुचिता' - purity of speech)

"And of what sort is purity of speech?"
"Herein a certain one abstains from falsehood... from idle babble. This is called 'purity of speech.'"

~भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सदाचाराविषयी तत्पर असणे व इतरांचा योग्य मान राखणे

|| तथागत बुद्धांची शिकवण ||
************************
"जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो व वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती या चार सुखांची प्राप्ती होते."

"He who is ever intent on good conduct and due reverence to others, who always venerates old age, --four happy consequences increasingly attend that man-- beauty and strength, and life and peace."

~भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
************************

शील, शिस्त, संयम आणि स्वतःवर नियंत्रण

|| तथागत बुद्धांची शिकवण ||
************************
"शील, शिस्त, संयम आणि स्वतःवर संपूर्ण नियंत्रण यांमुळे मनुष्य पवित्र होतो". 

("By the discipline of holy life, restraint and mastery of self, a man becomes holy.")

(~भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर)