एकच गाथा जाणून त्याप्रमाणे आचरण

|| तथागत बुद्धांची शिकवण ||
**************************.
  • "माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी त्याला त्यातील ओळींचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे? ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मुक्तीचा मार्ग चोखाळण्यासारखे आहे."
~ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल

|| तथागत बुद्धांची शिकवण ||
************************.
  • "माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विशद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठणाचा उपयोग काय? *धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले, तर त्यायोगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे"*
~ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

इतरांचा तिरस्कार करू नका

|| तथागत बुद्धांची शिकवण ||
************************

"मनुष्य कितीही विद्वान असला तरी, तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वतःला मोठा मानू लागला, तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार?"

~ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शील व आचरण महत्त्वाचे

|| तथागत बुद्धांची शिकवण ||

************************.
  • "विद्या अधिक नसली तरी चालते. कारण शील व आचरण हीच प्रथम महत्त्वाची गोष्ट आहे."
  • "माणसाला ज्ञान असेल तरी जोपर्यंत त्याचे त्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अधःपातापासून वाचवू शकत नाही."
***
"Learning need not be much; conduct (Sila) is the first thing."
"Though a man knows ever so much, if his knowledge reaches not to his life, to deliver him from the power which leads to destruction, what benefit can all his learning be?"

~ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर