"दुसरे काय अपशब्द बोलतात, काय दुष्कृत्ये करतात, काय पूर्ण करतात आणि
काय अपूर्ण सोडतात यावर दृष्टी केंद्रित ठेवू नका. आपण काय पूर्ण केले आणि
काय अपूर्ण सोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले." (बुद्धांची शिकवण)
- "बुद्ध आणि त्यांचा धम्म," डॉ. बाबासाहेब आंबेडकर
"Fix
not your gaze upon the ill-words and ill-deeds of others, upon what
others do or leave undone. Look rather at what by yourself have done or
left undone."
- "Buddha and His Dhamma," Dr. Babasaheb Ambedkar
बुद्धांची शिकवण: तथागत बुद्धांनी दिलेला सन्मार्ग म्हणजे महान शोध असून एक प्रगत व मानवतेला तारणारी शिकवण आहे. ही शिकवण, हा सन्मार्ग म्हणजेच 'बुद्धांचा धम्म'.
आपल्या स्वतःच्या कार्यावर लक्ष ठेवणे
बुद्धांचा मध्यम मार्ग
*बुद्धांचा मध्यम मार्ग*
जीवनाची आत्यंतिक अशी दोन टोके आहेत. एक सुखोपभोगाचे (a life of pleasure) व दुसरे आत्मक्लेशाचे (a life of self-mortification). एक म्हणतो, "खा, प्या, मजा करा. कारण उद्या आपण मरणारच आहोत." दुसरा म्हणतो, "सर्व इच्छा-आकांक्षा (वासना, desires) मारुन टाका. कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत." हे दोन्हीही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे; म्हणून बुद्धांनी ते नाकारले. बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते. 'मज्जिम पतिपद' - 'मधला मार्ग' जो अति-उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही.
~ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म: ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
एकच गाथा जाणून त्याप्रमाणे आचरण
|| तथागत बुद्धांची शिकवण ||
**************************.
- "माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी त्याला त्यातील ओळींचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे? ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मुक्तीचा मार्ग चोखाळण्यासारखे आहे."
~ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल
|| तथागत बुद्धांची शिकवण ||
************************.
- "माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विशद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठणाचा उपयोग काय? *धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले, तर त्यायोगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे"*
~ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
इतरांचा तिरस्कार करू नका
|| तथागत बुद्धांची शिकवण ||
************************
"मनुष्य कितीही विद्वान असला तरी, तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वतःला मोठा मानू लागला, तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार?"
~ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Subscribe to:
Posts (Atom)