पोस्ट नं 52

📚 पोस्ट नं 52 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग तिसरा- नव्या प्रकाशाच्या शोधात
🌷 2. सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास 🌷
Study of Sankhya
*************************

1) भृगुऋषीचा आश्रम सोडल्यावर गौतम आलारकालाम मुनींचे वसतिस्थान शोधावयास निघाला.

2) आलारकालाम त्या वेळी वैशालीस राहत होते. गौतम तेथे गेला. वैशालीस पोहचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला.

3) आलारकालांमाकडे जाऊन तो म्हणाला, "आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे."

4) त्यावर आलारकालाम म्हणाले, "तुझे स्वागत असो. माझा सिद्धांत असा आहे की, तुझ्यासारख्या बुद्धीमान माणसाला थोड्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करुन घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल."

5) "खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादण्यास तू अगदी पात्र आहेस."

6) आलारकालाम मुनींचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आंनद झाला आणि त्याने उत्तर दिले.

7) "माझे ज्ञान अपुरे असूनही, आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहचलो आहे असे मला भासत आहे."

8 ) "म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करुन आपण मला सांगाल काय?"

9) आलारकालाम म्हणाले, "तुझ्या मनाची थोरवी, तुझ्या स्वभावातील प्रामाणिकता आणि तुझा निश्चय यांच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे, की, तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्व-परीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही."

10) "हे श्रोतृश्रेष्ठा, आमची तत्त्वे ऐक!"

11) नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्त्वज्ञानाची तत्त्वे स्पष्ट करुन सांगितली.

12) आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलारकालाम म्हणाले,

13) "गौतमा, ही आमच्या तत्त्वज्ञानातील मूलतत्त्वे आहेत. मी तुला ती सारांशरुपाने सांगितली आहेत."

14) आलारकालामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला.

🌷🌿🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग तिसरा - नव्या प्रकाशाच्या शोधात
३. समाधी मार्गाचे शिक्षण
*********************

No comments:

Post a Comment