पोस्ट नं 89

📚 पोस्ट नं 89 📖
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग दुसरा- परिव्राजकांची धम्मदीक्षा
Conversion of Parivrajakas
🌷4. बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- अष्टांग मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग (ii) 🌷
The Buddha's First Sermon- Ashtanga Marga or The Path of Righteousness
*************************

18) "सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे?", परिव्राजकांनी विचारले. बुद्धांनी उत्तर दिले, "अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे."

19) "मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख दूर करण्याचा उपाय ही उदात्त सत्ये न समजणे म्हणजेच अविद्या होय."

20) "सम्यक दृष्टीकरिता माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे आवश्यक आहे."

21) "सम्यक दृष्टीकरिता माणसाने अंधश्रद्धा व अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे. (निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये)"

22) "ज्या सिद्धांताना (doctrines) वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत."

23) "स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत."

24) "प्रत्येक माणसाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात (aims, aspirations and ambitions). अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी (noble and praiseworthy). ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी. हा 'सम्यक संकल्पा' चा आशय आहे."

25) "सम्यक वाचा (Right Speech) पुढील शिकवण देते:
i) माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे
ii) असत्य बोलू नये
iii) माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये
iv ) माणसाने दुसऱ्याची निंदानालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे
v) माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरु नये
vi) माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे
vii) माणसाने अर्थहीन, मूर्खपणाची बडबड करु नये. त्याचे बोलणे संमजसपणाचे व मुद्देसूद असावे."

26) "मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने होता कामा नये (not to be the result of fear or favour). सम्यक वाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठाला काय वाटेल याचा सम्यक वाचेशी यत्किंचितही संबंध असता कामा नये."

27) "वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण नाही."

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*****************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
४. बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- अष्टांग मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग (iii)
*********************

No comments:

Post a Comment