

*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग दुसरा- परिव्राजकांची धम्मदीक्षा
Conversion of Parivrajakas


The Buddha's First Sermon- The Path of Purity
*************************
1) परिव्राजकांनी नंतर बुद्धांना आपला धम्म समजावून सांगण्याची विनंती केली.
2) बुद्धांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य केली.
3) त्यांनी प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला.
4) त्यांनी परिव्राजकांना सांगितले की, "ज्याला चांगला व्यक्ती होण्याची इच्छा आहे, त्याने 'जीवनाची तत्त्वे' म्हणून काही तत्त्वे पाळली पाहिजेत (must recognise some principles as principles of life). ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे."
5) "माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची तत्त्वे अशी आहेत:
i)कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे
ii) चोरी न करणे किंवा दुसऱ्याच्या मालकीची कोणतीही वस्तू स्वतःची न समजणे व गैरवापर/अपहार न करणे
iii) व्यभिचार न करणे
iv) असत्य न बोलणे
v) मादक पेय ग्रहण न करणे."
6) "माझे असे म्हणणे आहे की, प्रत्येक माणसाने ही तत्त्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मुल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की, ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करु शकेल (For every man must have a standard by which to judge whatever he does). आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे ही पाच तत्त्वे किंवा शीले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचे मापदंड आहेत."
7) "जगात सर्वत्र पतित लोक असतात. परंतु पतितांचे दोन वर्ग असतात. ज्यांच्यासमोर काही आदर्श आहे असे पतित आणि ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही असे पतित."
8 ) "ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही, अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही. त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो. याउलट ज्याच्यासमोर एखादा आदर्श आहे, असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो. का? याचे उत्तर असे की, आपण पतित आहोत हे त्याला माहीत असते."
9) "मनुष्यजीवनाचे नियमन करण्यासाठी त्याच्यासमोर मानक (मार्गदर्शक नियमावली) असणे (having a standard) आणि कोणतेच मानक नसणे यात फरक आहे. महत्त्वाची गोष्ट माणसाचे अधःपतन ही नसून त्या अवस्थेेतून मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव हीच होय."
10) "परिव्राजकहो, तुम्ही विचाराल की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास हीच तत्त्वे योग्य का?"
11) "या प्रश्नाचे उत्तर स्वतःलाच सापडेल, जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केलात की, ही तत्त्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय? किंवा ती सामाजिक हित साधणारी आहेत काय?"
12) "जर या प्रश्नांना तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर माझ्या विशुद्धी मार्गाची तत्त्वे जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळविण्यास लायक आहेत हेच त्यावरुन सिद्ध होईल."









*****************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
४. बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग
*********************
No comments:
Post a Comment