पोस्ट नं 77

📚 पोस्ट नं 77 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग सातवा- साम्य आणि भेद
Comparison and Contrast
🌷1. बुद्धांनी काय त्याज्य ठरविले (नाकारले) 🌷
What HE Rejected.
*************************

1) या तात्त्विक आणि धार्मिक विचारसरणींच्या अवलोकनावरुन असे दिसते की बुद्धांनी ज्या वेळी आपल्या शासनाचा पाया रचला (the Buddha formulated his Sasana), त्यावेळी काही रुढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती. त्या कल्पना खालीलप्रमाणे:-

(i) वेदप्रामाण्यावर विश्वास (infallibility of the Vedas)
(ii) आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्यांच्या पुनर्जन्माचा अंत, यावर विश्वास
(iii) 'मोक्षप्राप्तीची साधने' या दृष्टीने धार्मिक विधी, समारंभ व यज्ञ यावर विश्वास
(iv) समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास
(v) विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्त्व म्हणून ब्रम्हावर विश्वास
(vi) आत्म्यावर विश्वास
(vii) संसार, किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास
(viii) कर्मावर, म्हणजेच माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्माचे स्थान निश्चित होते या तत्त्वावर विश्वास.
**********

2) आपल्या शासनाची तत्त्वे ठरविताना बुद्धांनी आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला.

3) पुढील कल्पना त्यांनी त्याज्य ठरविल्या:-

i) मी कोण आहे, कोठून आलो, कोठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्यांनी धिक्कार केला.

ii) आत्म्याचे थोतांड त्यांनी धुडकावून लावले, आणि शरीर, संवेदना, चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्यांनी त्याग केला.

iii) काही धर्मगुरुंनी ज्यांचा प्रसार केला होता अशी शून्यवादी, निराशावादी मते (Nihilistic views) त्यांनी त्याज्य ठरविली.

iv) पाखंडी मताचा (views held by heretics) त्यांनी धिक्कार केला.

v) विश्वाच्या विकासाचा प्रारंभकाळ सांगता येतो हे म्हणणे त्यांनी अमान्य केले. (discarded the theory that the cosmic progress had a known beginning)

vi) ईश्वराने माणसाला निर्माण केले किंवा ब्रम्ह नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्यांनी त्याज्य ठरविले.

vii) आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्यांनी दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले.

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग सातवा- साम्य आणि भेद
२. बुद्धांनी कोणते बदल केले
*********************

No comments:

Post a Comment