

*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन


Kapila - The Philosopher
*************************
25) माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्यांचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी यापैकी पहिल्या घटकांचे सादृश्य आहे. दुसरा घटक प्रवृत्ती किंवा क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा घटक जड असून तो नियमन करतो आणि निष्क्रियता व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो.
26 ) या तीन घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतःच अत्यंत निकटचे असतात. ते एकमेकांवर मात करतात. एकमेकांना आधारही देतात आणि परस्परांत मिसळूनही जातात. हे घटक ज्योत, तेल आणि वात या दिव्याच्या घटकांप्रमाणे असतात.
२७) जेव्हा या तीन गुणांचा समतोल असतो आणि एक गुण दुसऱ्यापेक्षा वरचढ होत नाही, तेव्हा हे विश्व अचेतन (static) दिसते व त्याची उत्क्रांती थांबलेली असते.
28) जेव्हा या तीन गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होतो, तेव्हा हे विश्व सचेतन (dynamic) होते आणि त्याची उत्क्रांती सुरु होते.
29) गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की, दुःखाच्या अस्तित्वामुळे या तीन गुणांचा समतोल बिघडतो.
30) कपिलाच्या तत्वज्ञानातील सिद्धांत हे असे होते.
31) सर्व तत्ववेत्यांपैंकी कपिल मुनींच्या तत्त्वज्ञानाचा बुद्धांवर फार मोठा प्रभाव पडला होता.
32) ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यावर आधारलेली आहे असा कपिल हा एकच तत्त्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले.
33) तथापि, कपिलाने सांगितलेल्या सर्वच गोष्टींचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त तीन गोष्टी ग्राह्य धरल्या.
34) सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे, हे त्यांनी मान्य केले.
35) ईश्वर अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले.
36) जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले.
37) कपिलाच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टाच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला.









*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
३. ब्राह्मणे (i)
*********************
No comments:
Post a Comment