

*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग चौथा- ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी


Gautama who was a Bodhisatta, after Sammabodhi becomes a Buddha
*************************
1) ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ 'बोधिसत्त्व' होते. ज्ञानप्राप्तीनंतर ते 'बुद्ध' झाले.
2) बोधिसत्त्व कोणाला म्हणावे? आणि बोधिसत्त्व म्हणजे काय?
3) बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्त्व.
4) बोधिसत्त्व बुद्ध कसा होतो?
5) बोधिसत्त्व हा क्रमाने जीवनाची दहा स्थित्यंतरे बोधिसत्त्व राहिला पाहिजे.
'बुद्ध होण्यासाठी बोधिसत्त्वाने काय केले पाहिजे?'
6) बोधिसत्त्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता (joy, आनंद) प्राप्त करुन घेतो. सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो, त्याप्रमाणे बोधिसत्त्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करु लागतो की, प्रथम अविचारी असलेला, पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते.
7) जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता (purity, शुद्धता) प्राप्त होते. यावेळी बोधिसत्त्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो. तो सर्वांना दया दाखवतो. तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणाविषयी त्यांना नाउमेद करीत नाही.
8 ) जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत 'प्रभाकारी' (brightness, तेजस्विता) अवस्था प्राप्त करुन घेतो. यावेळी बोधिसत्त्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. 'अनात्म व अनित्यता' यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो.
9) जीवनाच्या चवथ्या अवस्थेत तो 'अर्चिष्मती' (अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता, intelligence) प्राप्त करुन घेतो. या स्थितीत बोधिसत्त्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विध व्यायाम, चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त क्रेंद्रित करतो.
10) जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो "सुदुर्जया" (जिंकण्यास कठीण अशी स्थिती) प्राप्त करुन घेतो. 'सापेक्ष आणि निरपेक्ष' यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते.
11) जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो 'अभिमुखी' होतो. या अवस्थेत 'पदार्थांची उत्क्रांती आणि तिचे कारण' याची 'बारा निदाने' पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते; आणि 'अभिमुखी' नावाच्या त्या ज्ञानामुळे, अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्याच्या अंतःकरणात अगाध करुणा उत्पन्न होते.
12) जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्त्व 'दूरङ्गमा' (दूर जाणे) ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्त्व आता दिक्कालातीत असतो. तो अनन्ताशी एकरुप झालेला असतो. तथापि, सर्व प्राणीमात्रांंविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाम-रूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांच्यापेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही, त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचरांतील तृष्णा शांत करतो. परोपकारबुद्धी, सहनशीलता, व्यवहारचातुर्य, शक्ती, शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो.









************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
४. बोधिसत्त्व गौतम सम्यक् संबोधीनंतर 'बुद्ध' होतात (ii)
*************************
No comments:
Post a Comment