पोस्ट नं 59

📚 पोस्ट नं 59 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग चवथा- ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी
Enlightenment and the Vision of a New Way
🌷 1. नव्या प्रकाशासाठी चिंतन (ii) 🌷
Meditation for New Light
**************************

8 ) नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा नाग-लोकांचा राजा आणि त्यांची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करुन घेणार अशा खात्रीने त्यांनी पुढीलप्रमाणे स्तुती केली.

9) "हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे, आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे; त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच."

10) "हे कमलनयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडफडवीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत, आणि आकाशात मंदमंद वायुलहरी वाहत आहेत; त्या अर्थी आपले ईप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित."

11) चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना ज्यांना पुराणांतरी (mythologically) माराची (कामाची) मुले असे म्हणतात त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले.

12) कदाचित माराची ही टोळी आपल्याला पराभूत करेल आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भिती वाटली.

13) दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राम्हण बळी पडले हे त्याला माहित होते.

14) म्हणून आपल्या अंगी असलेले सर्व धैर्य एकवटून तो माराला म्हणाला, "माझ्यामध्ये श्रद्धा (faith) आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहे. तुम्ही दुष्ट वासनांनो, माझा पराभव कसा करु शकाल? नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील; पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते."

15) एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले.

16) गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा निघून जातो; त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले.

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
२. ज्ञानप्राप्ती
*********************

No comments:

Post a Comment