

*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग तिसरा- नव्या प्रकाशाच्या शोधात


Trial of Asceticism
*************************
1) गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती. परंतु वैराग्यमार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगुऋषींचा आश्रम सोडला होता.
2) त्याला असे वाटले की, त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा; म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल.
3) त्याप्रमाणे गौतम गया नगरीस गेला. तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली. आणि उरुवेला येथे गयेचे राजर्षी 'नगरी' यांच्या आश्रमात वैराग्यमार्गाचा अभ्यास करण्यासाठी वसती करण्याचे त्याने निश्चित केले. वैराग्यमार्गाच्या अभ्यासासाठी नैरंजना नदीच्या काठीचे ते निर्जन आणि एकान्तातील स्थळ होते.
4) राजगृहात असताना त्याला जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते पाच परिव्राजक त्याला उरुवेला येथे आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते.
5) त्या भिक्षूंनी त्याला तेथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. गौतमाने त्यांची विनती मान्य केली.
6) नंतर त्याच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदरभावाने सेवा केली. ते नम्रतेने त्याच्या बरोबर राहू लागले.
7) गौतमाने सुरु केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरुप अत्यंत उग्र होते.
8 ) काही वेळा तो भिक्षेसाठी तो दोन घरी जाई. पण दर दिवशी सात पेक्षा अधिक घरी तो जात नसे. प्रत्येक घरी केवळ दोन घासांची भिक्षा घेई. पण सात पेक्षा अधिक घासांची भिक्षा तो स्वीकारीत नसे.
9) दररोज तो फक्त एक वाटीभर अन्नावर जगत असे. पण सात वाट्यांपेक्षा अधिक अन्न तो स्वीकारीत नसे.
10) काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच, किंवा दर दोन दिवसांनी एक वेळ याप्रमाणे जेवत असे. असे करता करता आठवड्यातून एकदा तर नंतर पंधरवड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्नभक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे.
11) त्याचा वैराग्यमार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी-बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्याचा आहार असे.









*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग तिसरा - नव्या प्रकाशाच्या शोधात
४. वैराग्याची कसोटी (ii)
*********************
No comments:
Post a Comment