पोस्ट नं 53

📚 पोस्ट नं 53 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग तिसरा- नव्या प्रकाशाच्या शोधात
🌷 3. समाधी मार्गाचे शिक्षण 🌷
Training in Samadhi Marga
*************************

1) आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गांचे परीक्षण करीत असताना ध्यानमार्गाची (समाधी, Concentration of the Mind) माहिती करुन घ्यावी असे त्याला वाटले.

2) ध्यानमार्गाचे तीन पंथ होते.

3) या सर्व प्रकारांत एक गोष्ट समान होती, आणि ती म्हणजे, ध्यान साधनेसाठी श्वासोच्छवासावर नियत्रंण ठेवणे.

4) एका पंथाने अनापानसति नावाची श्वासनियंत्रणाची पद्धती अनुसरली होती.

5) दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबिली होती. या पद्धतीत श्वासोच्छवास प्रक्रियेचे तीन भाग पडतात.
i) श्वास आत घेणे (पूरक)
ii) श्वास रोखून धरणे (कुंभक)
iii) श्वास बाहेर सोडणे (रेचक)

तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता.

6) आलारकालाम ध्यानमार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते. आलारकालामाच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यानमार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले.

7) म्हणून तो आलारकालामाशी याविषयी बोलला आणि "मला ध्यानमार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय?" असे त्याने त्यांना विचारले.

8 ) "मोठ्या आनंदाने!" आलारकालामांनी उत्तर दिले.

9) आलारकालामांनी ध्यानमार्गाचे तंत्र त्याला शिकविले. त्याच्या एकूण सात सिद्धी (stages) होत्या.

10) गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करु लागला.

11) त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविल्यानंतर "आणखी शिकण्यासारखे काही आहे काय?" असे गौतमाने आलारकालामांना विचारले.

12) आलारकालामांनी उत्तर दिले, "नाही मित्रा. माझ्याजवळ शिकविण्यासारखे जे होते ते एवढेच." नंतर गौतमाने आलारकालामाचा निरोप घेतला.

13) उद्दक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते. आलारकालामांनी जे ध्यानतंत्र संशोधिले होते, त्याच्यापेक्षा पुढची एक पायरी ध्यानीपुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती.

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग तिसरा - नव्या प्रकाशाच्या शोधात
३. समाधी मार्गाचे शिक्षण (ii)
*********************

No comments:

Post a Comment