

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*************************




*************************


Tributes to the Buddha's Greatness
*************************
44. *प्रा. ड्वाइट गोडार्ड म्हणतात:*
45. *"जगातल्या सर्व धर्मसंस्थापकांत भगवान बुद्धच फक्त एक असे थोर होते, की जे कोणत्याही बाह्य मदतीशिवाय आपली मुक्ती साध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा स्वभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले."*
46. "मानवतेची योग्यता उंचावण्याच्या कर्तृत्वात जर खऱ्या थोर माणसाचे मोठेपण सामावलेले असेल *तर असा खरा थोर असा तथागताशिवाय दुसरा कोण असू शकेल."*
47. "त्यांनी मानवाच्या वर दुसरे कोणीतरी संस्थापित करून त्याला तुच्छ व हीन न ठरवता *प्रज्ञा व मैत्रीच्या शिखरावर* (त्याला) प्रस्थापित करून उच्चत्व प्राप्त करून दिले आहे."
48. *"बौद्धधर्म" (Buddhism)* या ग्रंथाचा लेखक *ई. जे. मिल्स म्हणतो:*
49. "बौद्धधम्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात *ज्ञानाच्या मूल्यावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर* भर देण्यात आलेला नाही."
50. "आपले डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर देण्यात आलेला नाही."
51. "दुसऱ्या कोणत्याही धर्मात *मनोविकासासाठी इतकी सखोल योजना आखलेली नाही."*
52. *प्रा. डब्लू. टी. स्टेस* आपल्या *"बौद्धधर्मीय नीतीशास्त्र" (Buddhist Ethics)* या ग्रंथात म्हणतात:
53. "बौद्धधम्मातील नैतिक आदर्श पुरुष जो *अर्हत,* तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टींनी महान असला पाहिजे." (morally and intellectually great)
54. "तो तत्त्वज्ञ तसेच सदाचारीही असला पाहिजे."
55. "ज्ञान हे मुक्तीसाठी आवश्यक आहे आणि ते प्राप्त करण्यास अपयश येण्याची जी *दोन कारणे* आहेत. त्यांपैकी *अज्ञान हे एक* आहे, असे बौद्धधम्माने आग्रहपूर्ण सांगितले आहे (तृष्णा किंवा लोभ हे दुसरे).
56. "ह्या उलट ख्रिस्ती आदर्श पुरुषाच्या घडणीत ज्ञानाला अजिबात स्थान नाही."
57. "संस्थापकाच्या अतात्त्विक स्वरूपामुळे *ख्रिस्तधर्मी विचारधारेत मानवाच्या नैतिक आणि बौद्धिक बाजूत दुरावा निर्माण झाला आहे."* (the moral side of man has been divorced from the intellectual side)
58. "जगातल्या दुःखांपैकी पुष्कळशी दुःखे दुष्टपणापेक्षा *मूर्खपणामुळे आणि अंधश्रद्धेने* निर्माण झाली आहेत."
"Far more of the world's misery is caused by stupidity and blind faith than by wickedness."
59. *"भगवान बुद्धांनी या गोष्टींना (मूर्खपणा व अंधश्रद्धा यांना) मुळीच स्थान दिले नाही."*
60. *बुद्ध आणि त्यांचा धम्म किती श्रेष्ठ आणि अपूर्व, एकमेवाद्वितीय आहे हे स्पष्ट करण्यास एवढेसे पुरेसे आहे.*
(Enough unto this, to show how great and how unique is the Buddha and his Dhamma.)
61. *असे हे भगवान बुद्ध आपले गुरु असावेत असे कोण बरे म्हणणार नाही?*










*आता बाकी आहेत अखेरच्या फक्त 2 पोस्ट*













*************************
Link For Reading English text:
http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_buddha/09_epilogue.html#01







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:


*२. बुद्धांच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा*
*************************
No comments:
Post a Comment