पोस्ट नं 322

📚 पोस्ट नं 322 📖
*************************
🌷 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
🌳 *समारोप (उपसंहार)* 🌳
🌿Epilogue 🌿
*************************
🌷1. भगवान बुद्धांच्या महानतेची प्रशंसा(iii)🌷
Tributes to the Buddha's Greatness 
*************************
31. "त्यांचे (अणूंचे) सूक्ष्म कणांत विभाजन झाले- *धनविद्युत् जागृत असे धनविद्युत्कण (protons) व ऋणविद्युत् जागृत असे ऋणविद्युत्कण (electrons)."*

32. "निश्चित न बदलणाऱ्या वस्तुमानाची कल्पना (fixed unalterable mass) विज्ञानास कायमची अंतरली. चालू शतकात जगात असा समज आहे की, *प्रतिक्षणी पदार्थाचा उच्छेद होत आहे."*

33. *"भगवान बुद्धांचा अनित्यतेचा सिद्धान्त खरा ठरला आहे."* (transitoriness)

34. "विज्ञानाने असे सिद्ध केले आहे की, *विश्वाची गती संधीकरण, विभाजन, आणि पुनर्संधीकरण ह्या प्रक्रियांनुसार होत असते."*

35. "आधुनिक विज्ञानाचा विचारप्रवाह म्हणजे *अन्तिम सत्य, ऐक्य आणि अहंतेची विभिन्नता ह्यांची प्रवृत्ती."* The trend of modern science is the trend of ultimate reality, unity and diversity of ego.

36. *"आधुनिक विज्ञान म्हणजे बौद्धधम्मातील अनित्य आणि अनात्मवादाचा प्रतिध्वनी होय."*
(transitoriness and egolessness)

37. *श्री. इ. जी. टेलर* आपल्या *'बौद्धधर्म आणि आधुनिक विचारधारा' (Buddhism and Modern Thought)* ह्या ग्रंथात म्हणतात:

38. "बराच काळ मानवावर बाह्य शक्तींनी अधिकार गाजविला आहे. जर तो खरोखरच सुसंस्कृत, सभ्य (truely civilised) व्हावयाचा असेल तर त्याने स्वत:च्या तत्त्वांनी आत्मनियमन करण्यास शिकले पाहिजे. *बौद्धधम्म हीच जगातील सर्वप्रथम नैतिक विचारपद्धती आहे की, जिच्यामध्ये मानवास आत्मनियमन करण्याची शिकवण दिलेली आहे."*

39. "ह्यासाठी प्रगतिशील जगाला ही *सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्धधम्माची आवश्यकता आहे."*

40. यूनिटेरिअन मिनिस्टर, *रेव्हरण्ड लेस्ली बोल्टन* म्हणतात:

41. *"बौद्ध धम्माचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान हीच धम्माची फार सामर्थ्यशाली देणगी आहे,* असे मला दिसते."

42. "बौद्धधम्माप्रमाणे यूनिटेरिअन ख्रिस्ती बांधवही धर्मग्रंथ किंवा मतप्रणालीची बाह्य शक्ती नाकारून मानवाच्या अंतर्यामी असलेल्या मार्गदीपाचा आधार मान्य करतात."

43. *"यूनिटेरिअन* मताचे अनुयायी *येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्ध हे जीवनाचे उच्च भाष्यकार आहेत, असे मानतात."*

☘☘☘☘☘☘☘☘☘☘
*आता बाकी आहेत अखेरच्या फक्त 3 पोस्ट*
☘☘☘☘☘☘☘☘☘☘

🙏🙏🙏
*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
🌿 *उपसंहार* 🌿
*भगवान बुद्धांच्या महानतेची प्रशंसा(iv)*
*************************

No comments:

Post a Comment