पोस्ट नं 321

📚 पोस्ट नं 321 📖
*************************
🌷भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
🌳 *समारोप (उपसंहार)* 🌳
🌿Epilogue 🌿
*************************
🌷1. भगवान बुद्धांच्या महानतेची प्रशंसा(ii)🌷
Tributes to the Buddha's Greatness 
*************************

15. *श्री. विनवुड रीड म्हणतात:*

16. "जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडतो, जेव्हा कोट्यावधी संवत्सरांतील रक्त आणि अश्रूंनी लिहिलेली उत्क्रांतीची कथा आपण वाचतो, जेव्हा जीवन-नियंत्रणाचे नियम आणि विकासाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो, *तेव्हा परमेश्वर प्रेमरूप असल्याचे मत किती भ्रामक आहे ह्याची आपणास स्पष्ट जाणीव होते."*

17. *"प्रत्येक वस्तूत दुष्ट भ्रष्टता आणि स्वछंदी अपव्यय आढळतो.* प्राणिसृष्टीत जितके जन्मास येतात त्यांपैकी फक्त अल्पांशच जगतात. (very small percentage survives)

18. *"भक्षण करा आणि भक्ष्य व्हा हा महासागर, आकाश आणि अरण्याचा नियम आहे. हत्या हा विकासाचा नीतिनियम आहे."* (murder is the law of growth)

19. श्री. रीड आपल्या *'मानवाचे हौतात्म्य' (Martyrdom of Man)* ह्या ग्रंथात असे म्हणतात: *"भगवान बुद्धांचा धम्म किती तरी निराळा आहे."*

20. *डॉ. रंजन रॉय असे म्हणतात:*

21. "एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संवर्धन व संरक्षणविषयक तीन सिद्धान्त प्रभुत्वेकरून प्रचलित होते. कोणीही त्यांना आव्हान देऊ शकला नाही." (Three laws of conservation)

22. *"ते म्हणजे पदार्थ, वस्तुमान आणि कार्यशक्ती ह्यांचे सिद्धान्त होत.* (matter, mass and energy)

23. "हे तीनही *अविनाशी आहेत* (indestructible) असा विचार जोपासणाऱ्या आदर्शवादी तत्त्वज्ञांची ती हुकमी पाने होती."

24. "एकोणिसाव्या शतकातील वैज्ञानिकांच्या मते *हे तीन सिद्धान्त म्हणजे सृष्टीच्या निर्माणाचे कारक होत.*"

25. "एकोणिसाव्या शतकातील वैज्ञानिकांच्या मते *हे तीन सिद्धान्त म्हणजे विश्वाचे स्वाभाविक घटक होत.*"

26. "त्यांची कल्पना अशी: *विश्व हे अविनाशी अणूंनी (indestructible atoms) भरलेले आहे.*"

27. "एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस *श्री. जे. जे. थॉम्पसन आणि त्यांचे अनुयायी ह्यांनी अणुभंजनास प्रारंभ केला."*

28. "आणि आश्चर्य असे की, अणूंचे तुकडे होऊ लागले."

29. "ह्या तुकड्यांना *ऋणविद्युत्कण* (electrons) असे संबोधण्यात येऊ लागले. *ते सर्व समस्वरूप आणि ऋणविद्युत्जागृत होते."*

30. "मैक्सवेलने ज्या अणूंना विश्वाचे अथवा वास्तवतेचे अविनाशी आधारस्तम्भ मानले होते *ते अणू खण्डित झाले."*
"Atoms hailed by Maxwell as imperishable foundation-stones of the Universe or Reality broke down."

☘☘☘☘☘☘☘☘☘☘
*आता बाकी आहेत अखेरच्या फक्त 4 पोस्ट*
🙏🙏🙏
*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
🌿 *उपसंहार* 🌿
*भगवान बुद्धांच्या महानतेची प्रशंसा(iii)*
*************************

No comments:

Post a Comment