पोस्ट नं 320

📚 पोस्ट नं 320 📖
*************************
🌷भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
🌳 *समारोप (उपसंहार)* 🌳
🌿Epilogue 🌿
*************************
🌷1. भगवान बुद्धांच्या महानतेची प्रशंसा🌷
Tributes to the Buddha's Greatness 
*************************

1. *भगवान बुद्धांचा जन्म दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी झाला.*

2. आधुनिक विचारवंत आणि शास्त्रज्ञ त्यांच्याविषयी आणि त्यांच्या धम्माविषयी काय म्हणतात? ह्या विषयावरील त्यांच्या विचारांचा हा संग्रह उपयुक्त व्हावा.

3. *प्रा. एस एस. राघवाचार म्हणतात:*

4. *"भगवान बुद्धांच्या जन्मापूर्वीचा काळ*
हा भारतीय इतिहासातील तमोयुगापैकी एक होता.* (one of the darkest ages)

5. *"प्रज्ञेच्या दृष्टीने ते एक मागासलेले युग होते.* शास्त्रप्रामाण्य व धर्मग्रंथांविषयी निर्विवाद पूज्यभाव, हे तत्कालीन विचारांचे वैशिष्ट्य होते."

6. *"नैतिकतेच्या दृष्टीने ते एक तमोयुग होते."*

7. "श्रद्धाळू हिंदूंच्या मते नैतिकतेचा अर्थ म्हणजे धर्मग्रंथांनुसार आचारविधींचे यथातथ्य आचरण."

8. "आत्मत्याग किंवा संकल्पाची पवित्रता ह्यांसारख्या खऱ्या नैतिक विचारांना तत्कालीन नैतिक अभिज्ञतेत योग्य ते स्थान नव्हते."

9. *श्री. आर. जे. जैकसन म्हणतात:*

10. "भगवान बुद्धांच्या शिकवणीचे अपूर्व स्वरूप भारतीय धार्मिक विचारधारांच्या अध्ययनातून प्रतीत होते."

11. "ऋग्वेदाच्या ऋचांत मानवाचे विचार बहिर्मुख, स्वतःपासून दूर आणि ईश्वराभिमुख असल्याचे आपणास आढळते."

12. "बौद्ध धम्माने मानवात अस्तित्वात असलेल्या अंतःसामर्थ्याच्या शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले." (Buddhism directed man's search inwards to the potentiality hidden within himself)

13. "वेदांमध्ये आपणास प्रार्थना, प्रशंसा आणि पूजा, worship आढळते."

14. "बौद्धधम्मातच प्रथमतः सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्कारांचे महत्त्व सांगितलेले आढळते." (Training of the mind to make it act righteously.)

☘☘☘☘☘☘☘
*आता बाकी आहेत अखेरच्या फक्त 5 पोस्ट*
🙏🙏🙏
*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
🌿 *उपसंहार* 🌿
*भगवान बुद्धांच्या महानतेची प्रशंसा (ii)*
*************************

No comments:

Post a Comment