पोस्ट नं 319

📚 पोस्ट नं 319 📖
*************************
🌷भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
आठवा खंड- महामानव सिद्धार्थ गौतम
Book VIII- THE MAN WHO WAS SIDDHARTH GAUTAMA
*************************
भाग तिसरा - तथागतांची आवड व नावड
Part III- His Likes and Dislikes
*************************
🌷4. बुद्धांचे सुंदरतेबद्दलचे प्रेम 🌷
His love for the lovely
*************************

1. एकदा शाक्य देशातील सक्कर ह्या नगरात तथागतांचे वास्तव्य होते.

2. त्या समयी स्थविर आनन्द तथागतांकडे आले आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूस बसले. अशा रीतीने आसनस्थ झाल्यावर स्थविर आनंद बोलले,

3. "भगवान, जीवनात अर्धे महत्त्व *सुंदरतेशी मैत्री जोडण्यात आहे, सुसंगतीचा सहवास जोडण्यात आहे, सुसंगतीशी दाट स्नेह जोडण्यात आहे."*

4. "आनन्द, असे म्हणू नकोस, असे म्हणू नकोस. *सुंदरतेशी मैत्री, सहवास व निकट स्नेह ह्यांचे जीवनात सर्वस्वी महत्त्व आहे.*
(Say not so, Ananda! It is the whole, not the half of the holy life - this friendship, this association, this intimacy with what is lovely)

5. "जो सुंदरतेचा कल्याण-मित्र, सहवासी आणि निकट परिचित आहे *अशा भिक्खूकडून* अशी अपेक्षा आहे की, *तो अरिय-अष्टांगिक मार्गाचा विकास करील. तो अरिय-अष्टांगिक मार्गाचा जास्तीत जास्त लाभ घेईल."*

6. "आणि आनन्द, असा भिक्खू अरिय-अष्टांगिक मार्गाचा विकास कसा करील किंवा त्यापासून अधिकाधिक लाभ कसा घेऊ शकेल?"

7. "अशा वृत्तीने तो सम्यक् दृष्टी प्राप्त करील; जी त्याग, विराग, विराम ह्यांवर आधारित असून जिची परिणती आत्मसमर्पणात होते. *तो सम्यक् संकल्प, सम्यक् वाणी, सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीविका, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृती, तसेच सम्यक समाधी याची प्राप्ती करील,* ज्यांची परिणती आत्मसमर्पणात होते."

8. "आनन्द, *जो भिक्खू सुंदरतेचा कल्याण-मित्र, सहवासी आणि दाट स्नेही आहे* तो अशा रीतीने अरिय-अष्टांगिक मार्गाचा विकास करतो आणि त्यापासून जास्तीत जास्त लाभ घेतो."

9. *"सुंदरतेशी मैत्री, सहवास आणि निकट स्नेह ह्यांचे जीवनात सर्वस्वी महत्त्व कसे आहे* हे तुला समजण्यास आनन्द, हाच मार्ग आहे."

10. *"आनन्द, खरोखर जे प्राणी नाशवंत, मर्त्य, दुःख, शोक व आपत्तीग्रस्त आहेत त्यांना सुंदरतेशी, सुसंगतीशी मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते.* (friendship with what is lovely)

11. *"आनंदा, सुसंगतीशी, सुंदरतेशी मैत्री, सहवास व निकट स्नेह ह्यांचे जीवनात कसे सर्वस्वी महत्त्व आहे* ते तुला आता समजू शकेल."

*************************
🌳 *आठवा खंड समाप्त* 🌳
*************************
🙏🙏🙏
*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
🌿 *उपसंहार* 🌿
*भगवान बुद्धांच्या महानतेची प्रशंसा*
*************************

No comments:

Post a Comment