

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*************************
आठवा खंड- महामानव सिद्धार्थ गौतम
Book VIII- THE MAN WHO WAS SIDDHARTH GAUTAMA
*************************
भाग दुसरा - तथागतांची मानवता
Part II- His Humanity
*************************


His Concern for the Sick
*************************
*(3.i)*
1). एकदा एक भिक्खू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच पडून राहिला होता.
2). स्थविर आनंदाबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्खूच्या निवासस्थानी आले.
3). आपल्या मलमूत्रात लोळत पडलेल्या भिक्खूला तथागतांनी पाहिले. ते त्याच्यापाशी गेले व म्हणाले, "भिक्खू, तुला काय होत आहे?"
4). "भगवान, मी अतिसाराने आजारी आहे."
5). "तुझी सेवा करण्यास कोणी आहे काय?"
6). "भगवान, कोणी नाही."
7). "भिक्खू, तुझी कोणी दुसरे भिक्खू सेवा करीत नाहीत, असे का?"
8). "भगवान, मी कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून कुणी माझी पर्वा करीत नाहीत."
9). मग तथागत आनंदाला म्हणाले, "आनंद, जा आणि पाणी घेऊन ये. ह्या भिक्खूला मी स्वच्छ करतो."
10) "होय, महाशय," आनंद त्यांना म्हणाला. त्याने पानी आणल्यावर तथागतांनी पाणी ओतले व आनंदाने त्या भिक्खूचा देह स्वच्छ केला. नंतर तथागतांनी त्याचे डोके व आनंदाने पाय धरून त्याला उचलून बिछान्यावर ठेवला.
11) नंतर तथागतांनी त्या क्षणी सर्व भिक्खूगणांना पाचारण केले व ते म्हणाले,
12) "अमुक एका निवासात कोणी भिक्खू आजारी आहे काय?"
13) "होय, भगवान."
14) "तो कशामुळे आजारी आहे?"
15) "भगवान त्या भिक्खूला अतिसार झाला आहे."
16) "भिक्खूवर्गहो, त्याची कुणी सेवा करीत आहे काय?"
17) "नाही. भगवान!"
18) "का नाही? त्याची सेवा का करीत नाहीत?"
19) "तो भिक्खू कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून भिक्खू त्याची सेवा करत नाही."
20) "भिक्खुहो, तुमची काळजी वाहन्यास तुमचे मातापिता नाहीत. तुम्ही जर परस्परांची सेवा केली नाही तर दुसरे कोण करणार? भिक्खुहो, जो माझी सेवा करु इच्छितो त्याने रुग्णांची सेवा करावी."
21) "त्याला जर गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्याची काळजी वाहावी आणि रुग्ण बरा होईपर्यन्त प्रतीक्षा करावी. जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्खू असेल अथवा शिष्य, सहवासी किंवा गुरुबंधू असेल तर त्याने त्याची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यन्त प्रतीक्षा करावी. जर कुणी रुग्णाची सेवा करणार नसेल तर तो त्याचा गुन्हा समजावा."



*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग तिसरा - त्यांची मानवता
*३. रुग्णांबद्दल चिंता (ii)*
*************************
No comments:
Post a Comment