

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग चवथा- बुद्धांचे मित्र आणि प्रशंसक चाहते
Part IV- Friends and Admirers
*************************


The Devotion of Mallika
*************************
1) एकदा जेव्हा तथागत बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनात राहिले होते तेव्हा एका गृहस्थाचा एकुलता एक प्रिय पुत्र निधन पावला. ह्यामुळे त्या गृहस्थाने आपला व्यवसाय व खाणेपिणे सोडून दिले.
2) तो दररोज स्मशानभूमीत जाई आणि मोठमोठ्याने विलाप करी. "हे लाडक्या मुला तू कुठे आहेस? तू कुठे आहेस?"
3) तो शोकग्रस्त पिता तथागतांकडे आला व अभिवादन करुन एकीकडे बसला.
4) शून्यमनस्क, निर्विकार व आगमनाचे प्रयोजन न जाणणाऱ्या त्याच्या अवस्थेकडे पाहून तथागत त्याला म्हणाले, "तुझी अवस्था ठीक नाही. तुझे मनही स्थिर नाही."
5) "माझा एकुलता एक लाडका मुलगा मरण पावला असता माझे चित्त कसे स्थिर राहू शकेल?"
6) "होय सदगृहस्था! आपले प्रियजन दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट ह्यास कारणीभूत होतात."
7) तो गृहस्थ रागावून बोलला, "असे कोण म्हणू शकतो? छे छे. आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुख देतात."
8). आणि असे बोलून तथागत बुद्धांच्या शब्दाचा धिक्कार करुन तो रागाने उठला आणि निघून गेला.
9) जवळपास काही जुगारी खेळत होते. तो गृहस्थ त्यांच्याकडे गेला आणि श्रमण गौतमास आपली शोककथा आपण कशी सांगितली त्यांनी त्यावर काय उत्तर दिले व आपण रागाने तिथून कसे निघालो हे त्यांना निवेदन केले.
10) जुगारी म्हणाले "तुमचे म्हणणे बरोबर आहे. आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उगमस्थान आहेत." त्या गृहस्थाला ते जुगारी आपल्याच मताचे असल्याबद्दल बरे वाटले.
11) हळुहळू ही गोष्ट पसरत पसरत राजाच्या अंतःपुरापर्यत जाऊन पोहोचली. राजाने मल्लिकेला सांगितले की, तुझे श्रमण गौतम म्हणतात की प्रियजन दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट ह्यास कारणीभूत होतात.
12) "महाराज, जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे."
13) "मल्लिके! जसा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला 'होय बरोबर आहे' असे म्हणून मान्यता दर्शवितो, तसेच श्रमण गौतम जे जे बोलतात ते 'जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे' असे बोलून तू मान्यता दर्शवितेस. जा, चालती हो."
14) तेव्हा मल्लिकेने नलिध्यान ब्राम्हणास पाचारण केले आणि सांगितले की तथागतांच्याकडे जा. आपल्या वतीने त्यांना शिरसाष्टांग प्रणिपात कर. त्यांचे कुशल विचार आणि ते म्हणतात असे जे सांगितले जाते ते खरे आहे काय ह्याची चौकशी कर.
15) "आणि ते जे काय बोलतील ते मला तसेच सांगा" ती म्हणाली.
16) राणीच्या आज्ञेच्या परिपालनार्थ ब्राम्हण निघाला आणि तथागताकडे जाऊन त्यांना ते तसे बोलले की काय असे त्याने विचारले.
17) "होय ब्राम्हणा, आपले प्रियजन आपल्याला दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट देतात. हा पहा पुरावा."
18) "एकदा या श्रावस्तीत एका स्त्रीची माता मरण पावली. शोकविव्हल होऊन वेड्यासारखी ती रस्त्यावरून भटकू लागली आणि माझी आई तुम्ही पाहिलीत का? असे प्रत्येकाला विचारु लागली."
20) तिसरा पुरावा. श्रावस्तीतील एका गृहस्थाची माता, पिता, बंधु, भगिनी, पुत्र, कन्या व पत्नी निधन पावली. शोकविव्हल होऊन वेड्यासारखा तो गल्लोगल्ली रस्तोरस्ती भटकू लागला आणि आपले प्रियजन कोणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारु लागला.
21) "आणखी एक पुरावा. श्रावस्तीत एक स्त्री आपल्या माहेरी गेली. तिच्या घरची मंडळी पतीपासून तिला विभक्त करुन तिला न आवडणारया दुसरया एकाबरोबर तिचा विवाह करुन देण्याच्या विचारात होती."
22) "तिने आपल्या पतीस हे सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे दोन तुकडे केले आणि मग स्वतः आत्महत्या केली जेणेकरुन त्या दोघांचे एकत्र निधन व्हावे."
23) नलिध्यान ब्राम्हणाने हे सर्व राणीला यथातथ्य कथन केले.
24) त्यानंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली, "आपली एकुलती एक कन्या वजिरा आपणास प्रिय आहे काय?" "होय, प्रिय आहे." राजाने उत्तर दिले.
25) "आपल्या लाडक्या वजिराला काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही?" "जर तिला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल."
26) "मला जर काही झाले तर आपणास दुःख होईल कि नाही?" "जर तुला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल."
28) "महाराज, काशीकोशल नागरिक आपणास प्रिय आहेत काय?" "होय," राजाने सांगितले. "जर त्यांना काही झाले तर आपणास दुःख होईल कि नाही?"
29) "जर त्याना काही झाले तर त्याचा घोर परिणाम होईल. आणखी निराळे कसे बरे होईल?"
30 ) "तर मग तथागत ह्याशिवाय निराळे काही बोलले का?" "नाही, मल्लिके." राजा पश्चातापदग्ध स्वराने बोलला.
*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
तथागतांचे मित्र आणि प्रशंसक चाहते
*४. गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा*
*************************
No comments:
Post a Comment