पोस्ट नं 262

📚 पोस्ट नं 262 📖
*************************
🌷बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग पाचवा- उपासकांसाठी विनय
Part V- Vinaya for the Laity
*************************
🌷3. मुलांसाठी विनय 🌷
Vinaya for Children
*************************

1) मुलांनी आई वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की, माझ्या आईवडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्ये करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे. आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलांवर प्रेम करीत असतात. दुर्गुणापासून त्यांना परावृत्त करतात. सद्गुणाचा त्यांना उपदेश करतात. आपल्या व्यवसायाचे शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करुन देतात आणि योग्य वेळी आपली सर्व मालमत्ता त्याच्यावर सोपवतात.

🌷4. शिष्यांसाठी(विद्यार्थ्यांसाठी) विनय🌷
Vinaya for Pupils

1) शिष्याने पुढीलप्रमाणे आपल्या गुरुची सेवा करावी, ते आले असता आसनावरुन उठून त्यांना मान द्यावा. त्यांना अभिवादन करावे. त्यांची सेवा करावी. ते शिकवतील ते उत्सुकतेने शिकावे. त्याचे कोणतेही काम करावयास पडले तरी ते करावे आणि अध्यापन करीत असताना एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे. कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात. जे त्यांना ज्ञान आहे ते शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्यांचे ज्ञान गुरु अध्यापनाने दृढ करतात, सर्व विद्या आणि कला त्याला पुर्णपणे शिकवतात. त्यांचे मित्र आणि सोबत्यांशी त्याच्यासंबंधी चांगले बोलतात. आणि ते सर्व बाजूने त्यांच्या रक्षणाची काळजी घेतात.

**********************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग पाचवा- उपासकासाठी विनय
*५. पती-पत्नीसाठी आणि मालक व नोकर यांच्यासाठी विनय*
*************************

No comments:

Post a Comment