पोस्ट नं 230

📚 पोस्ट नं 230 📖
*************************
🌷बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- बुद्धांची प्रवचने
Part IV- His Sermons
*************************
III (तीन)- बुद्धांची सदाचरणावरील प्रवचने
SECTION THREE-- Sermons on Righteousness
🌷4. सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल? 🌷
How to Reach Perfection in Righteous Conduct
***********************

1) श्रावस्ती येथील जेतवनात तथागत राहात असता त्यांच्याकडे पाचशे उपासक आले. त्यांच्यात *धम्मिक* हा होता.

2) धाम्मिकाने भगवंतांना विचारले, "कोणत्या तत्त्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येते?"

3) "मी आपणाला हा प्रश्न विचारीत आहे, याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे, हे ठरविण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही."

4) "सुशिक्षित जैन आणि परिव्राजक यांनाही आपले मतखंडनात यश आले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राम्हण आणि ज्यांना आपले मत मांडण्याची फार हौस, त्या सर्वांनी आपला सत्य सिद्धान्त मान्य केला. आपला हा सिद्धान्त समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविता की, तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवान, म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या."

5) "हे निर्मळ व विशेष असे ज्ञान आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या."

6) उपासकांच्या संबंधीच्या करुणेने तथागताने उत्तर दिले, "ऐका तर. मी आपणाला शुद्धाचरणाची तत्वे सांगत आहे; ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे."

7) "हत्या करु नका, देहान्त शासन करु नका. हिंसेला अनुज्ञा देऊ नका. कोणत्याही प्रकारच्या जीवाला, मग तो सबल असो अथवा दुर्बल असो, दुःख देऊ नका."

8) "उपासकांनी स्वतः चोरी करु नये. दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये. अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये. जे स्वेच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे."

9) "अब्रम्हचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. संयम व ब्रम्हचर्य साधत नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी व्यभिचार करू नये, तिला कुमार्गाला लावू नये."

10) "सभांत, न्यायगृहात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नये. त्याप्रमाणेच असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा."

11) "उपासकांनी मद्यपान करू नये. दुसऱ्याला मद्य पाजू नये. मद्यपानाला संमती देऊ नये. मद्यपानाने बुद्धीभ्रंश होतो, हे लक्षात ठेवा."

12) "मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवाना पापास प्रवृत्त करतात. तेव्हा या बुद्धीभ्रंश करणाऱ्या व्यसनाच्या मूर्खपणापासून आणि 'मूर्खाचा स्वर्ग' ह्यांपासून परावृत्त व्हा."

13) "हत्या करू नका. चोरी करू नका. खोटे बोलू नका. उन्मादक पेय सेवन करू नका. व्यभिचार करू नका. भर रात्री कुग्रास अन्न सेवन करू नका."
"Slay not, nor steal, nor lie; from strong drink keep away; refrain from lechery; touch not wrong meals at night!"

14) "गंधमाला धारण करू नका. आपला बिछाना भूमीवर पसरा. *प्रत्येक उपोसथाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतःकरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा."*
"Eschew both scents and wreaths; spread on the ground thy bed; so make thy sabbath vows as week succeeds to week, and keep with pious hearts this eightfold festival."

15) "प्रातःकाळी हे व्रत ग्रहण करून शुद्ध, कृतज्ञ व श्रद्धायुक्त अंतःकरणाने याचकांना अन्नपाणी दान करा."

16) "आपल्या आईबापांची प्रेमाने काळजी घ्या. चांगला व्यवसाय करीत जा. या मार्गाचे एकनिष्ठतेने अवलंब करणारा उपासक उच्चपद प्राप्त करील."

**********************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*सदाचरणाच्या मार्गावर सहप्रवाशांची वाट पाहण्याची आवश्यकता नाही*
*************************

No comments:

Post a Comment