
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर



*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
II (दोन)- शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने
SECTION TWO-- Sermons on the Need for Maintaining Character


Need for Doing Good Deeds
************************
1) एकदा तथागत भिक्खूंना म्हणाले:
2) "सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, ईप्सित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्माचा लाभ. या गोष्टींचा मी अनुभव घेतला नि त्याची ग्वाही मी देऊ शकतो."
3) "मी वारंवार स्वतःला विचारतो, 'हे जे मी फळ चाखीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम? मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सतकर्माचा परिपाक आहे?"
4) "आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की, हे तीन प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो तीन प्रकारच्या सतकर्माचा परिपाक होय. दान, शील, संयम या तीन सत्कर्माचा परिपाक होय."
5) "मंगलमय, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात. तोच खरा शुभ दिन, तोच खरा सुखमय क्षण. जेव्हा सत्पात्री दान दिले जाते, ज्या वेळी मंगल कर्मे, उत्तम वचन, उत्तम विचार आणि मंगल इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला चांगले, मंगलमय लाभ घडवून देतात ती वेळ आणि तो दिवस खरोखरच पवित्र आणि आनंददायक होय."
6) "ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते ते खरोखरच सुखी होत. तुम्हीही त्याप्रमाणेच समृद्ध, निरामय (निरोगी) आणि आपल्या आप्टेष्टांसह सुखी व्हावे."
*******************
*


*******************
1) एकदा श्रावस्तीतील जेतवनात राहत असता तथागत भिक्खूंना उद्देशून म्हणाले:
2) "निर्मळ आणि सुखी जीवनासाठी कुशल संकल्प करण्यांची अत्यंत आवश्यकता आहे."
3) "कोणते संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो ते ऐका:"
4) "असा संकल्प करा की, आयुष्यभर मी आपल्या माता पित्याचें परिपालन करीन. मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करीन. माझी वाणी सदैव मृदु राहील. मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन. औदार्याने शुभ हस्ताने दान करण्यात आनंद मानीत राहीन, आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानीन. वर मागण्यास योग्य असा मी मनुष्य होईन."
5) "आयुष्यभर शांत राहीन. क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ मी निरोध करीन."
6) "भिक्खूंनो असे हे सात प्रकारचे संकल्प आहेत, जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल."
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*सदाचरणावरील प्रवचने*
*************************
No comments:
Post a Comment