

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग तिसरा- बौद्ध जीवनमार्ग
Part III- Buddhist Way of Life
8. विवेकशीलता आणि एकाग्रता
9. जागरूकता, कळकळ आणि धैर्य
*************************


On Thoughtfulness and Mindfulness
*************************
1) *प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा. सावधान राहात जा (Be Thoughtful, Be Mindful). आस्थायुक्त आणि धैर्यशील राहात जा.* (in all things, be earnest and bold)
2) *हा बौद्ध जीवनमार्ग होय.*
3) आपण जे काही आहोत ते आपण केलेल्या विचारांचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारांवर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचारांचेच बनलेले आहे. जर मनुष्य दुर्विचाराने बोलू लागेल, कृती करू लागेल तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहाते. शुद्ध विचाराने बोलले आणि चालले तर सौख्य चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व आहे.
4) अविचारी बनू नका. आपल्या विचारांवर लक्ष असू द्या (watch your thoughts). चिखलात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झटतो त्याप्रमाणे असत, वाईट व दुःखदायक मार्गापासून आपली मुक्तता करा.
5) शहाण्या माणसांनी आपल्या विचारांची राखण करावी. कारण विचार हे कळायला कठीण, अतिशय धूर्त असून, जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे धावत राहतात. सु-रक्षित (well-guarded) विचार हे सौख्यदाते आहेत.
6) कसेतरी शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहाते त्याप्रमाणे चिंतनरहित मनात विकार प्रवेश करतात.
7) ज्याप्रमाणे व्यवस्थित शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही. (passion will not break through a well-reflecting mind)
8) माझे मन एके काळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते; परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने क्षुब्ध गजाला वळवित असतो त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवित आहे.
9) दुर्निवार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे. काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे.
10) दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालणारे लोक काम-बंधनापासून (temptations) विमुक्त होतात.
11) जर माणसाची श्रद्धा (faith) अचल, स्थिर नसेल, जर सद्धम्म त्यास माहित नसेल आणि जर त्याची मनःशांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही (his knowledge will never be perfect).
12). एक द्वेष्टा (hater) दुसऱ्या द्वेष्ट्याला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो त्यापेक्षा जास्त उपद्रव वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन निर्मिते.
13) आईबाप, आप्टेष्टांपेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते.





On vigilance, earnestness and boldness
1) शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या, शहाणपणाच्या शिखरावर चढतो आणि दुःखविमुक्त होऊन तो तेथून दुःखात सापडलेल्या मानवजातीकडे पाहात असतो. शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वतशिखरावरून दरीतील दिसणाऱ्या माणसासारखा आहे.
2) निष्काळजी लोकामंध्ये जागरूक, निद्रितांमध्ये जागृत असा तो शहाणा मनुष्य उमदा घोडा जसा अडेलतट्टूला मागे टाकून पुढे जात असतो तशी प्रगती करीत असतो.
3) निष्काळजीपणाच्या (negligence) अधीन होऊ नका. कामभोगापासून (lust) दूर राहा. जागरूक मनुष्य चिंतनशील असतो.
(the vigilant is given to meditation)
4) दक्षता (अप्रमाद), earnestness अमर आहे. अविचार (प्रमाद) मृत्यूचे पद आहे (heedlessness is way to death). अप्रमादी हे कधीच मरत नाहीत. उलट प्रमादी हे मृतवतच आहेत.
5) दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरविलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये. एकदा ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा. धम्मानुसार आचरण करण्याच्या ध्येयापासून ढळू नका.
6) सावधान-चित्त (watchful) राहा. आळस सोडा. सम्यक् मार्गाचा अवलंब करा. जो या जगात सम्यक् मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो.
7) आळशीपणा म्हणजे अपयश, सुस्तपणा म्हणजे अपवित्रता. सतत प्रयत्न आणि सम्यक् दृष्टी ह्यांच्या साहाय्याने शरीरात घुसलेला आळशीपणा–हा विषारी बाण उपटून काढा.
8) प्रमादात फसू नका. विषयोपभोगात आसक्त राहू नका. अप्रमत्त बना व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा.
9) जो अप्रमत्त आणि जागरूक आहे, स्मृतिमान आहे, सुविचारपूर्वक काम करणारा आहे; जो संयमी आहे, जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे, अप्रमत्त आहे व धम्मानुसार जीवन जगतो–अशा माणसाचे यश सारखे वाढत असते.
*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*दुःख आणि सुख; दान आणि कर्म*
*************************
No comments:
Post a Comment