पोस्ट नं 215

📚 पोस्ट नं 215 📖
*************************
🌷बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग तिसरा- बौद्ध जीवनमार्ग
Part III- Buddhist Way of Life
*************************
🌷4. क्रोध आणि वैर 🌷
On Anger and Enmity
*************************

1) *मनात क्रोधभावना ठेवू नका. वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका.*

2) *हाच बौद्ध जीवनमार्ग आहे.*

3) क्रोधाग्नीे शांत करा.

4) "तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागविले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले" असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात, त्याचा क्रोधविकार कधीही शमत नाही.

5) ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत, त्याचा क्रोध शांत झालेला असतो.

6) शत्रू शत्रूच्या वाईटावर, द्वेष्टा द्वेष्ट्याच्या वाईटावर टपलेला असतो.

7) माणसाने क्रोधाला प्रेमाने जिंकावे, दुष्टपणाला चांगुलपणाने जिंकावे, लोभाला दिलदारपणाने, दानशीलतेने जिंकावे व असत्याला सत्याने जिंकावे.

8). खरे बोलावे, रागावू नये. मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे.

9) क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा. सर्व बंधनांवर जय मिळवावा; येणेप्रमाणे जो नामरुपाविषयी (name and form) अनासक्त असतो, कशालाही माझे माझे म्हणत नाही, असा अपरिग्रही दुःख भोगत नाही.

10) वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबवून धरतो, त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत.

11) विजयामुळे वैर वाढते (conquest begets enmity), पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो; परंतु ज्याने जयापजयाच्या कल्पनेचाच त्याग केला आहे असा शांत मनुष्य सुखाने झोप घेतो.

12) कामाग्नीसारखा (lust) अग्नी नाही आणि द्वेषासारखे (hatred) दुर्दैव नाही. उपादान स्कंधासारखे (constituents of existence) दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठी सुख-शांती नाही.

13) द्वेषाने द्वेष कधीही शांत होत नाही. प्रेमानेच तो शांत होतो; हा प्राचीन नियम आहे.

*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*मनुष्य, मन आणि मनोमल*
*************************

No comments:

Post a Comment