

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग दुसरा- पारिभाषिक शब्दसाम्यामुळे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात
Part II- How Similarities in Terminology Conceal Fundamental Differences
चार- संसरण
Section IV- Transmigration
*************************


**********************
1) बुद्धांनी पुनर्जन्म प्रवचिला आहे; परंतु त्यांनी आत्म्याचे संसरण (एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश) प्रवचिले नाही.
2) बुद्धांनी दोन परस्परविरोधी सिद्धान्तांचे प्रवचन केले, असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते.
3) असे टीकाकार प्रश्न करीत की, "संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे?"
4) ते म्हणत, "आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे. हे संभवनीय तरी आहे काय?"
5) (परंतु बुद्धांच्या सिद्धान्तात) परस्परविरोधी असे काहीच नाही. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे.
6) हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदाला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते.
7) ब्याक्ट्रियाचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले, "भगवान बुद्ध पुनर्जन्म मानीत होते काय?"
8) नागसेनाने उत्तर दिले, "होय."
9) "ह्यामध्ये परस्परविरोध नाही काय?"
10) नागसेन– "नाही."
11) "आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय?"
12) नागसेन– "अर्थात; निश्चित शक्य आहे."
13) "हे कसे शक्य आहे, हे समजावून सांग बरे?"
14) "नागसेन, जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे?" राजाने विचारले.
15) "हो शक्य आहे."
16) "कसे शक्य आहे हे उदाहरणाने स्पष्ट कर."
17) "राजा, समज, माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला तर असे म्हणता येईल काय की, पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले?'
18) "अर्थात नाही."
19) "राजा, त्याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे."
20) "ह्याची अधिक उदाहरणे देऊन ते स्पष्ट कर बरे."
21) "बाळपणी आपल्या गुरूपासून शिकलेली एखादी कविता, हे राजा, तुला आठवते काय?"
22) "होय, आठवते!"
23) "तर मग त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय?"
24) "अर्थात नाही."
25) "याप्रमाणेच संसरणाविना पुनर्जन्म होतो."
26) "वा, छान! नागसेन!"
27) "नागसेन, आत्मा अशी काही चीज आहे काय?"
28) 'यथार्थ दृष्टीने पाहिले असता, राजा, आत्मा अशी काही चीज नाही."
29) "वा, छान! नागसेना!"
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*गैरसमजुतीचे कारण*
*************************
No comments:
Post a Comment