

*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग दुसरा- पारिभाषिक शब्दसाम्यामुळे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात
Part II- How Similarities in Terminology Conceal Fundamental Differences
एक- पुनर्जन्म
Section I- Rebirth
*************************


Preliminary
************************
1) मृत्यूनंतर काय होते? हा प्रश्न नेहमी विचारला जातो.
2) तथागत बुद्धांच्या समकालीनांमध्ये ह्याविषयी दोन भिन्न मते होती. *पहिले मत शाश्वततावाद (Eternalist) आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद (Annihilationist).*
3) शाश्वततावादी म्हणायचे की, आत्म्याला मृत्यू नसल्यामुळे जीवन शाश्वत (eternal) आहे. पुनर्जन्माने जीवन पुढे चालू राहते असे शाश्वततावादी मानीत असत.
4) *मृत्यू म्हणजे सर्वनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही, हा उच्छेदवाद्यांचा सिद्धांत.*
5) बुद्ध हे शाश्वततावादी नव्हते. कारण शाश्वततावादानुसार 'पृथक् आणि अमर' (separate, immortal soul) अशा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवावा लागतो. आणि त्यास तर बुद्धांचा विरोध होता.
6) तथागत बुद्ध हे उच्छेदवादी होते काय? आत्म्याचे अस्तित्व मानीत नसल्याने, बुद्ध हे स्वाभाविकतः उच्छेदवादी असतील असे अपेक्षित असणार.
7) *परंतु आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुद्धांनी अलगद्दुप्पम सुत्तात तक्रार केलेली आहे.*
8). *ते म्हणतात, "माझी शिकवण वेगळी असता, काही श्रमण आणि ब्राम्हण चुकीने आणि अप्रामाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसवून मी उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवितो, असा माझ्यावर आरोप करतात."*
9) "खरोखर मी तसे शिकवित नाही आणि तरीसुद्धा हे भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने माझ्यावर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात!"
10) हे विधान जर खरोखर बुद्धांचे असेल, बुद्ध धम्मावर ब्राम्हणी सिद्धान्त लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षिप्त विधान नसेल, तर एक गंभीर समस्या उभी राहते (ती समस्या अशी):
11) *भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानीत नाहीत, मग ते आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतात?*
12) यातून एक प्रश्न उद्भवतो तो असा की, *"भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात काय?"*
*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग दुसरा- पारिभाषिक शब्दसाम्यामुळे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात?
२. पुनर्जन्म कशाचा?
*************************
No comments:
Post a Comment