

*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग पहिला- बुद्धांचे त्यांच्या धम्मात स्थान
Part I- His Place in His Dhamma
*************************


Morality and Religion
*************************
1) नीतीचे धर्मात स्थान कोणते?
2) खरे तर धर्मात नीतीला स्थान नाही.
3) *धर्माचे विषय म्हणजे ईश्वर, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ/बळी हे होत.*
4) एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो.
5) 'शान्ती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीची एक बाब' या कारणासाठी केवळ धर्मात नीतीचा समावेश होतो.
6) धर्म हा एक त्रिकोण आहे.
7) आपल्या शेजाऱ्याशी चांगुलपणे वागा; कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरे आहात.
8). ही धर्माची विचारसरणी आहे.
9) प्रत्येक धर्म नीती शिकवितो. *परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे.*
10) *ती त्याला जोडलेला एक डबा आहे. वेळ पडेल त्याप्रमाणेच तो त्याला जोडला जातो किंवा त्यापासून सोडविला जातो.*
11) धर्माच्या व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे.
12) *म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही.*










*************************


Dhamma and Morality
*************************
1) धम्मात नीतीचे स्थान कोणते?
2) याचे साधे उत्तर म्हणजे *नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती.*
3) दुसऱ्या शब्दांत बोलायचे म्हणजे, *धम्मात जरी ईश्वराला स्थान नाही तरी त्याचे स्थान नीतीने घेतलेले आहे.*
4) *धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ/बळी यांना स्थान नाही.*
5) नीती हे धम्माचे सार आहे. त्याशिवाय धम्म नाही.
6) *माणसाने माणसावर प्रेम करणे आवश्यक आहे; या आवश्यकतेतूनच नीतीचा उगम होतो.*
7) त्यासाठी ईश्वराच्या आज्ञांची/ मंजुरीची आवश्यकता नाही. *ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी काही माणसाने नीतीमान व्हायचे नाही, तर स्वहितासाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे.*
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
६. केवळ नीती पुरेशी नाही. ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे
*************************
No comments:
Post a Comment