पोस्ट नं 197

📚 पोस्ट नं 197 📖
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग पहिला- बुद्धांचे त्यांच्या धम्मात स्थान
Part I- His Place in His Dhamma
🌷1. धर्म (Religion) म्हणजे काय? 🌷
What is Religion?
*************************

1) धर्म (Religion) हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही.

2) तो शब्द अनेक अर्थी आहे.

3) याचे कारण *धर्म (Religion) हा निरनिराळ्या अवस्थांतून गेलेला आहे.* एका अवस्थेतील त्याचा अर्थ मागील किंवा पुढील अवस्थांतील अर्थाशी समान नाही. तरी त्या सर्व अवस्थांसंबंधी हा एकच शब्द वापरला जातो.

3) धर्माचा आशय कधीही निश्चित असा नव्हता.

4) तो वेळोवेळी बदलत गेला आहे.

5) वीज, पाऊस, पूर इत्यादी ज्या घटनांचे कार्यकारणभाव आदिमानवाला स्पष्ट करता येत नसत, तेव्हा त्यांच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करी त्यांना जादू म्हणत. प्रारंभी धर्म आणि जादू ही एकरूपच होती. (Religion therefore came to be identified with magic)

7) धर्माच्या विकासाच्या दुसऱ्या अवस्थेत *धर्माने विश्वास, धार्मिक कर्मकांड, विधी, प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप धारण केले.*

8). परंतु ह्या गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून, त्या धर्मापासून उद्भवलेल्या म्हणजे गौण आहेत.

9) धर्माच्या केंद्रबिंदूला ज्या विश्वासापासून प्रारंभ होतो तो विश्वास असा की, अशी एक शक्ती आहे की, जिच्यामुळे सर्व चमत्कार घडून येतात, परंतु जी आदिमानवाच्या ज्ञानसामर्थ्याच्या पलीकडे आहे. ह्या अवस्थेत जादूची महती कमी झाली.

10) प्रारंभी ती अज्ञात व अज्ञेय शक्ती सैतानी समजली जाई, परंतु पुढे असे वाटू लागले की ती कल्याणकारीही आहे.

11) ती कल्याणकारी शक्ती प्रसन्न करून घ्यावयाला आणि त्या सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी विश्वास, कर्मकांड, विधी आणि यज्ञ यांची आवश्यकता भासली.

12) *यानंतर ह्या शक्तीला ईश्वर अथवा निर्माता अशी संज्ञा देण्यात आली.*

13) या नंतरच्या धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत *'ईश्वरानेच हे सर्व जग आणि माणसे निर्माण केली' अशी समजूत रूढ झाली.*

14) या अवस्थेनंतर, माणसाला आत्मा आहे, तो अमर आहे आणि माणसाच्या या जगातील कृत्यांबद्दल त्याला ईश्वरासमोर जाब द्यावा लागणार आहे अशी समजूत रूढ झाली.

15) धर्मविचाराचा विकास थोडक्यात वरील प्रमाणे सांगता येईल.

16) *ईश्वरावर श्रद्धा, आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास, ईश्वरपूजा, चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा, प्रार्थनाविधी व यज्ञयाग इत्यादींनी ईश्वराला प्रसन्न करणे म्हणजे धर्म अशी संकल्पना तयार झाली आणि हे सर्व आशय धर्म या शब्दाने व्यक्त होतात.*

*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
२. धम्म हा धर्मापासून (Religion) वेगळा कसा
*************************

No comments:

Post a Comment