

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
विभाग तीन- धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे
Section III
Dhamma to be Saddhamma must promote Maitri


Dhamma is Saddhamma only when it Teaches that Mere Pradnya is Not Enough: it must be accompanied by Sila
***********************
1) प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे.
2) केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे.
3) प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे.
4) शीलवान माणसाच्या हातून दुसऱ्याला वाचविण्यासाठी तलवारीचा उपयोग केला जाईल.
5) परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल.
6) म्हणूनच शील हे प्रज्ञेपेक्षा महत्त्वाचे आहे.
7) प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धत (thinking aright). शील हा आचारधम्म; म्हणजे योग्य वागण्याची पद्धती (acting aright).
8). शीलाविषयी तथागत बुद्धांनी पाच मूलतत्त्वे सांगितली आहेत.
9) पहिले जीवहत्येसंबंधी
10) दुसरे चोरीसंबंधी
11) तिसरे वैषयिक अनीतीसंबंधी
12) चौथे खोटे बोलण्यासंबंधी
13) आणि पाचवे मद्यपानासंबंधी.
14) आणि ह्यापैकी प्रत्येकासंबंधी तथागत बुद्धांनी असे सांगितले आहे की, हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैषयिक अनीती (व्यभिचार) करू नये, आणि मद्यपान करू नये.
15) बुद्धांनी प्रज्ञेपेक्षा शीलाला महत्त्व दिले आहे याचे कारण स्पष्ट आहे.
16) "ज्ञानाचा उपयोग माणसांच्या शीलावर अवलंबून आहे. शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे," असे ते एके ठिकाणी म्हणतात.
17) दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात, "या जगात शीलाची तुलना दुसऱ्या कोणत्याही सद्गुणाशी होऊ शकत नाही."
18) "शील हा प्रारंभ आणि शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थांतील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणून आपले शील शुद्ध करा."
*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
२. धम्म जेव्हा 'प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता आहे' असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्मरुप प्राप्त होते.
*************************
No comments:
Post a Comment