

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग चवथा- धम्म म्हणजे काय नाही?
Part IV- What is Not- Dhamma?


Belief in Soul is not Dhamma
************************
*(१)*
(18. "ही दुरावस्था थांबविण्याचा एक मार्ग आहे तो असा: आपल्या राज्यात जो कोणी गुरे-ढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे, शेती पेरण्याला बी-बियाणे द्यावे. आपल्या राज्यांत जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे.")
*************************
19) "मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील आणि देशात उत्पात होणार नाही. राजाचा अधिकार होऊ लागेल. देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकांवर संतुष्ट राहून आपली मुले कडेखांद्यावर घेऊन नाचेल. आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल."
20) "तेव्हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले, लोक आपापल्या कामात मग्न झाले. देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजांचा कारभार वाढत राहिला. देश सुख, शांती, अनुभवू लागला आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाली; आपली मुले कडेखांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागली."
21) "जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलाविले आणि म्हटले, "सर्व उत्पात शांत झाला आहे. देश खुशालीत आहे, मला आता महायज्ञ करावयाचा आहे. तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे."
22) "पुरोहिताने राजाला उत्तर दिले, "राजा, आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्याप्रमाणेच राज्यात जे जे मंत्री, अधिकारी, आणि प्रतिष्ठित ब्राम्हण असतील त्याप्रमाणेच जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आंमत्रणे पाठवून कळवावे की, मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी."
23) "हे ब्राम्हण कूटदंता, त्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. क्षत्रिय, मंत्री, ब्राम्हण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठविले की, 'महाराज आपण यज्ञ करावा, यज्ञाला हीच योग्य वेळ आहे.'"
24) "राजा विजेता हा सूज्ञ आणि गुणसंपन्न होता. त्याचा पुरोहितही तितकाच सूज्ञ आणि गुणसंपन्न होता."
25) "ब्राम्हणहो, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले."
26) "तो पुरोहित बोलला, "महाराज, यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला की, 'अरेरे! मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला?' तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये."
27). "हे ब्राम्हणहो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणा-या लोकांच्यापुढे यज्ञानंतर मनःस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले, "महाराज आपल्या या यज्ञात जीवहिंसक, त्याप्रमाणेच अहिंसक, चोर, त्याचप्रमाणे चोरी न करणारे, विषयोपभोगी, दुर्वर्तन करणारे, त्याचप्रमाणे त्यापासून परावृत्त असलेले, असत्यवादी, त्याचप्रमाणे सत्यवादी, निंदक, त्याचप्रमाणे निंदेपासून परावृत्त असलेले, उद्धट, त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे, व्यर्थ बडबडणारे, त्याचप्रमाणे व्यर्थ न बडबडणारे, द्वेष करणारे, त्याचप्रमाणे द्वेष न करणारे, लोभी, त्याचप्रमाणे निर्लोभी, दुष्ट दृष्टीचे, त्याचप्रमाणे सम्यक् दृष्टीचे, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यांपैकी दुष्कृत्ये करणा-या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या; परंतु जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावेत. त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्याच संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे."
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
५. यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा धम्म नाही (iii)
*************************
No comments:
Post a Comment