

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग चवथा- धम्म म्हणजे काय नाही?
Part IV- What is Not- Dhamma?


Dhamma Based on Union with Brahma is a False Dhamma
************************
25) वीज (electricity) अदृश्य असली तरी तिच्यापासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मानतो.
26) वीजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण वीजेची वास्तविकता मान्य करतो.
27) परंतु हे अदृश्य ब्रम्ह, दृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते?
28) उत्तर आहे की, 'कोणतीच नाही.'
29) दुसरे एक उदाहरण देता येते. कायद्यामध्येही अशी एक पद्धत आहे की, काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते. ते सिद्ध करता येत नाही. ते केवळ कायद्यातील 'कल्पना' (Fiction) असते.
30) आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला (Legal fiction) मान्यता देतो.
31) पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो?
32) कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण 'या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात' हे आहे.
33) ब्रम्ह ही सुद्धा एक कल्पना आहे; परंतु त्यापासून कोणते उपयुक्त परिणाम संभवतात?
34) वासेट्ठ आणि भारद्वाज यांच्याजवळ काही उत्तर नव्हते, ते स्तब्ध होते.
35) आपली विचारप्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासेट्ठाकडे वळून तथागताने विचारले, "तुम्ही ब्रम्ह पाहिले आहे काय?"
36) "तीनही वेद जाणणाऱ्या त्या ब्राम्हणांमध्ये एक तरी ब्राम्हण असा आहे काय, की ज्याने ब्रम्ह प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे?"
37) "नाही गौतमा, निश्चित पाहिले नाही."
38) "त्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राम्हणांच्या एका तरी गुरूने ब्रम्ह प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे काय?"
39) नाही गौतमा, "निश्चित पाहिलेले नाही."
40) "वासेट्ठ, त्या ब्राम्हणांच्या सात पिढ्यांत एक तरी ब्राम्हण असा झाला काय, की ज्याने ब्रम्ह समोरासमोर पाहिले?"
41) "नाही, गौतमा, निश्चित पाहिलेले नाही."
42) "ठीक वासेट्ठ! ब्राम्हणाच्या पुरातन ऋषींनी तरी असे म्हटले होते काय, की आम्ही ब्रम्ह जाणतो, आम्ही ते कुठे आहे -इथे आहे की तिथे आहे- ते पाहिलेले आहे?"
43) "नाही, गौतमा, नाही!"
44) तथागत त्या दोन ब्राम्हण तरुणांना प्रश्न विचारीत राहिले.
45) "मग वासेट्ठा, तुला असे वाटत नाही काय, की यावरून त्या ब्राम्हणाच्या ब्रम्ह सायुज्याच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या?"
46) "वासेट्ठा, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते, त्यातील सर्वांच्यापुढे असणाऱ्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही. त्याप्रमाणेच, मला वाटते, ह्या ब्राम्हणांचे शब्द त्या आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. त्या ब्राम्हणांचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यांत काही अर्थ नाही."
47) "वासेट्ठ, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणा-या माणसासारखी नाही काय?"
48) आणि लोक त्याला विचारणार, "मित्रा, ज्या अति सुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिची वांछा करीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय आहे, की ब्राम्हण आहे, की वैश्य आहे, की शूद्र आहे?"
49) "आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतील तेव्हा तो 'नाही' असेच उत्तर देणार."
50) "जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील, 'बरे, मित्रा, जी सर्व प्रदेशातील अति सुंदर स्त्री आहे. जिच्यावर तू प्रेम करतोस, जिची वांछा धरतोस, पण तिचे नाव तरी काय आहे? तिच्या कुळाचे नाव काय आहे? ती उंच आहे, की ठेंगणी आहे, की मध्यम उंचीची आहे? ती कृष्ण वर्णाची आहे, की गव्हाळ वर्णाची आहे, की सुवर्ण वर्णाची आहे? ती कोणत्या खेड्यात, गावात अथवा शहरात राहते?' परंतु हे सर्व प्रश्न विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तो 'नाही' असेच उत्तर देणार."
51) "वासेट्ठ, हे सर्व तुला आता कसे वाटते? तुला असे वाटत नाही काय, की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खतापूर्ण आहे?"
52) ते दोन्हीही ब्राम्हण तरुण बोलले, "होय, खरोखर तसेच आहे."
53) यास्तव ब्रम्ह हेच वास्तव नसून त्यावर आधारलेला धर्म हा उपयुक्त नाही.
*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
४. आत्म्यावरील विश्वास हा खरा धम्म नाही
*************************
No comments:
Post a Comment