पोस्ट नं 155

📚 पोस्ट नं 155 📖
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग तिसरा- धम्म म्हणजे काय?
Part III- What is Dhamma?
🌷3. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. 🌷
To Live in Nibbana is Dhamma
**************************

1) *"निब्बाणासारखे खरे सुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही," असे बुद्धांनी सांगितले आहे.*

2) भगवान बुद्धाने शिकविलेल्या सर्व सिद्धांतांचा निब्बाण हा *केंद्रवर्ती सिद्धांत* आहे.

3) निब्बाण म्हणजे काय? बुद्धप्रणीत निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे.

4) बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानीत असत.

5) *चार प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे.* (1) पहिला लौकिक- म्हणजे खा-प्या, मजा करा, या जड-स्वरुपाचा; (2) दुसरा यौगिक; (3) तिसरा ब्राम्हणी आणि (4) चौथा उपनिषदिक.

6) ब्राम्हणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोनही कल्पनांत आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे, असे मानले जाई. *भगवान बुद्धाने हा सिद्धांत नाकारला आहे.* म्हणून निब्बाणविषयक ब्राम्हणी आणि औपनिषदिक शिकवणूक नाकारणे भगवान बुद्धांना कठीण गेले नाही.

7) निब्बाणाची लौकिक-कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची, भौतिकवादी (materialistic) असल्यामुळे भगवान बुद्धांस ती कधीच पटली नव्हती. कारण या लौकिक-कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून जी ऐंद्रिय भूक (animal appetites) गरजा असतात, त्यांचे शमन करणे, ह्यापलीकडे दुसरा आशय नाही. त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते.

8) असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे *बुद्धांच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे आहे.*

9) कारण ऐंद्रिय भूक/शारिरीक गरजांचे अधिक शमन करणे म्हणजे अधिक भूक निर्माण करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने मिळणाऱ्या सुखामुळे अधिक दुःख निश्चितपणे निर्माण होते.

10) योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी व्यवस्था होती. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरुपाचे होते, आणि ते मिळविण्यासाठी सर्व संसार-पराङमुख व्हावे लागते. त्यांच्या योगाने वेदना टाळता येतात; परंतु सुख मिळत नाही, आणि सुख मिळालेच तर ते योग चालू आहे तोपर्यंतच. ते स्थायी स्वरुपाचे नव्हते. अस्थायी स्वरुपाचे होते.

11) भगवान बुद्धांची निब्बाणविषयक कल्पना त्यांच्यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती.

12) त्यांच्या निब्बाण कल्पनेत *तीन विचारांचा, संकल्पनांचा* अंतर्भाव होतो.

13) *आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख* हा एक विचार.

14) *जिवंतपणी ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख* हा निब्बाणाचा दुसरा विचार.
आत्म्याची संकल्पना आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे दोन विचार बुद्धांच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत.

15) भगवान बुद्धांच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे "सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे."

🌸☘🌸☘🌸
*************************
For English: see the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
खंड तिसरा:
भाग तिसरा- धम्म म्हणजे काय?
३. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे (ii)
*************************

No comments:

Post a Comment