

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग तिसरा- धम्म म्हणजे काय?
Part III- What is Dhamma?


To Reach Perfection in Life is Dhamma
**************************
1) तीन प्रकारच्या पूर्णता असतात.
2) कायिक, वाचिक आणि मानसिक.
3) मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते?
4) आसवे अथवा चित्तमल पूर्णपणे नष्ट होऊन ह्या जीवनात संपूर्ण चित्त-विमुक्तीचा अनुभव घेणे, प्रज्ञेने आसवांपासून विमुक्ती मिळवून त्याच अवस्थेत सतत वर्तणे ह्यासच पूर्णता म्हणतात.
5) आणखीही पारमिता आहेत, आणि भगवान बुद्धाने त्या सुभूतीला सांगितल्या.
6) सुभूति: बोधिसत्त्वाची "दान-पारमिता" कोणत्या प्रकारची असते?
What is a Bodhisattva's perfection of giving?
7) *तथागत:* बोधिसत्त्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूंचे दान करतो आणि त्या सर्व प्राणिमात्रांना दिल्यावर 'बोधि' (supreme enlightenment) ला त्या अर्पण करतो. दुस-यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते. ह्या अवस्थेला *दान-पारमिता* म्हणतात.
8) सुभुति: बोधिसत्त्वाची "शील-पारमिता" कशी असते?
Perfection of morality
9) तथागत: या पारमितेत तो स्वतः *सदाचाराची दहा पथ्ये* पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो.
Lives under the obligation of the ten ways of wholesome acting.
10) सुभुति: बोधिसत्त्वाची "क्षान्ति/संयम -पारमिता" कशी असते?
Perfection of patience
11) तथागत: या पारमितेत तो स्वतः सहनशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो.
12) सुभूति: बोधिसत्वाची "वीर्य-पारमिता" कशी असते? Perfection of vigour.
13) तथागत: या पारमितेत तो पाचही पारमितांच्या परिपूर्तीत अखंड कार्यरत राहतो आणि इतरानांही तसेच करण्याची प्रेरणा देतो.
14) सुभूति: बोधिसत्त्वाची "समाधी ही पारमिता" कशी असते? Concentration (or meditation)
15) तथागत: या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो; तथापि तो तत्संबंधित रूप-लोकात परत जन्म घेत नाही आणि इतरांनाही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो.
16) सुभूति: बोधिसत्त्वाची "प्रज्ञा-पारमिता" कशी असते?
perfection of wisdom
17) तथागत: या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात (भौतिक अथवा आधिभौतिक) मग्न न राहता सर्व धर्माच्या मूळ स्वरूपाचे चिंतन करीत असतो, आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देतो.
18) *अशा पारमिता अंगी बाणविणे यालाच धम्म म्हणतात.*
It is Dhamma to cultivate these perfections.
*************************
For English: see the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
खंड तिसरा:
भाग तिसरा- धम्म म्हणजे काय?
३. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे
*************************
No comments:
Post a Comment