पोस्ट नं 151

📚 पोस्ट नं 151 📖
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग दुसरा- भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी विविध मते
Part II- Different Views of the Buddha's Dhamma
🌷1. इतरांच्या मतेे बुद्धांनी काय शिकविले? 🌷
What others have understood Him to have Taught
**************************

1) भगवान बुद्धांची शिकवणूक कोणती?

2) या प्रश्नासंबंधी त्यांच्या कोणत्याही दोन अनुयायांत किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकांत एकमत नाही.

3) काहींच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे.

4) काहींच्या मते त्यात विपश्यना (एक प्रकारचा प्राणायाम) महत्वाची आहे.

5) काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षितांनाच सांगावयाचा गुप्त मंत्र आहे. तर इतरांना, तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो.

6) काहींच्या मते ती एक रुक्ष दर्शनपद्धती आहे.

7) काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे.

8) काहींच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे.

9) काहींच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर विरोध शिकविणारे ते शास्त्र आहे.

10) बौद्ध धम्मासंबंधीचा आणखी पुष्कळच भिन्न मतांचा संग्रह करता येईल.

11) ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे.

12) यांपैकी काही मते एकांगी विचारवंतांची आहेत. असे लोक म्हणजे ज्यांना बौद्धधम्माचे सार समाधी, विपश्यना किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक.

13) दुसरी मते, प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्धधम्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम होय. या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो. त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा असतो.

14) त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नसतात.

15) धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानववंशशास्त्र त्याचेही ते अभ्यासक नसतात.

16) प्रश्न असा उद्भवतो की, बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगावयाचा नव्हता काय?

17) या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धम्माचे विद्यार्थी दोन मुद्यांचा हवाला देतात. ते म्हणतात–

18) "भगवान बुद्धांनी अहिंसा शिकविली."

19) "भगवान बुद्धांनी शांती शिकविली."

20) त्यांना आणखी असा प्रश्न केला की, "भगवान बुद्धांनी त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय?"

21) "भगवान बुद्धांनी न्याय शिकविला काय?"

22) "भगवान बुद्धांनी प्रेम शिकवले काय?"

23) "भगवान बुद्धांनी स्वातंत्र्य शिकविले काय?"

24) "भगवान बुद्धांनी समता शिकविली काय?"

25) "भगवान बुद्धांनी बंधुता शिकविली काय?"

26) "बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो काय?"

27) बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न सहसा क्वचितच उपस्थित केले जातात.

28) माझे असे उत्तर आहे की, *"भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता. तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो;"* परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी अगदी गाडून टाकली आहेत.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

2. भगवान बुद्धांनी स्वतः केलेले वर्गीकरण
The Buddha's Own Classification

1) भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केले आहे.

2) पहिल्या वर्गाला त्याने धम्म ही संज्ञा दिली. (Dhamma)

3) त्याने एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला 'जो धम्म नाही तो- अधम्म' असे नाव दिले. तथापि तो धम्म ह्याच नावाने ओळखला गेला. (Not- Dhamma)

4) त्याने तिसराही एक वर्ग निर्मिला आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली. (Saddhamma)

5) हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्त्वज्ञानाचे दुसरे नाव होय.

6) भगवान बुद्धांचा धम्म समजण्यासाठी *धम्म, अधम्म आणि सद्धम्म* ह्या तीनही वर्गांना समजून घेतले पाहिजे.

*************************
तिसरा खंड- भाग दुसरा समाप्त
*************************
For English: see the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
खंड तिसरा:
भाग तिसरा- धम्म म्हणजे काय?
१. जीवन-शुचिता राखणे म्हणजे धम्म
*************************

No comments:

Post a Comment