

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पहिला- त्यांच्या धम्मात बुद्धाचे स्थान
Part I- His Place in His Dhamma


The Buddha did not claim any Divinity for Himself or for His Dhamma. It was discovered by man for man. It was not a Revelation.
**************************
1) प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणूक दैवी असल्याचा हक्क सांगितला आहे.
2) मोझेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही, परंतु आपल्या शिकवणुका मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले आहे की, दुधा-मधाच्या प्रदेशात ज्यांना जावयाचे असेल त्यांनी ही शिकवणूक मान्य केली पाहिजे. कारण ती जिव्होवाची म्हणजे ईश्वराचीच शिकवण आहे.
3) येशू ख्रिस्तांनी आपण ईश्वरपुत्र असल्याचे स्वतःच सांगून दैवीपणावर हक्क सांगितला आहे. स्वाभाविकपणे त्यांची शिकवणूकही दैवी झाली आहे.
4) कृष्णाचे म्हणणे असे की, 'मी स्वतः ईश्वर आहे आणि गीता हा माझा शब्द आहे.'
5) तथागत बुद्धाने मात्र आपल्या शासनासंबधी किंवा स्वत:संबंधी कधीही असा दावा मांडला नाही.
6) तो तर असे म्हणत असे की, 'आपण इतर माणसांसारखे माणूस आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने आपणास दिलेला संदेश आहे.'
7) आपला संदेश प्रमादातीत आहे, असे त्याने कधीच म्हटले नाही. (He never claimed infallibility for his message)
8) तो म्हणतो, 'माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मुक्तीकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे.' हा एकच दावा बुद्धाने केला आहे.
9) *त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसांचा जगासंबंधीचा अनुभव!*
(It was based on universal human experience of life in the world)
10) तो म्हणत असे की, *'त्यात कितपत सत्य आहे, हे पाहण्यासाठी त्या संबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे.'*
11) कोणाही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही.
(No founder has so fully thrown open his religion to such a challenge)
*************************
तिसरा खंड- भाग पहिला समाप्त
*************************
For English: see the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
खंड तिसरा:
भाग दुसरा- भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी विविध मते
१. इतरांच्या मते बुद्धाने काय शिकविले?
*************************
No comments:
Post a Comment