

*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग सातवा- महिलांची धम्मदीक्षा
Conversion of Women


Conversion of Prakrati, a Chandalika
*************************
20) जेव्हा आनंद जेतवनात परतला तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्याने पाहिले.
21) या मुलीने आपला कसा पिच्छा पुरविला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले. भगवंतांनी तिला बोलाविण्यास सांगितले.
22) मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला, "तू आनंदाचा पिच्छा का पुरवीत आहेस?" मुलगी म्हणाली, "त्यांच्याशी मला लग्न करायचे आहे. ते अविवाहित असल्याचे मी ऐकले आहे व मीही अविवाहित आहे."
23) भगवंत म्हणाले, "आनंद हा भिक्खू आहे; आणि त्याच्या डोक्यावर केस नाहीत. जर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहीन."
24) मुलीने उत्तर दिले, "माझी तयारी आहे." भगवंत म्हणाले, "मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळविली पाहिजेस."
25) मुलगी आईकडे आली आणि म्हणाली, "आई, तुला जे करता आले नाही ते मी केले आहे. मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंतांनी दिले आहे."
26) आई रागावली आणि म्हणाली, "तू तसे मुळीच करता कामा नये. तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजेस. आनंदासारख्या श्रमणांशी लग्न करण्यास तू इतकी कां उतावीळ झाली आहेस? त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईन."
27) तिने उत्तर दिले, "मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन. माझ्यापुढे तिसरा पर्याय नाही."
28) आई म्हणाली, "तू माझा अपमान का करीत आहेस?" मुलगी म्हणाली, "जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करु दे."
29) आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले.
30) नंतर ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणाली, "आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले आहे."
31) तथागतांनी तिला विचारले, "तुला काय पाहिजे आहे? त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो?" मुलगी म्हणाली, "माझे त्यांच्या नाकावर प्रेम आहे. त्यांच्या मुखावर प्रेम आहे, त्यांच्या कानावर प्रेम आहे. त्यांच्या आवाजावर प्रेम आहे, त्यांच्या डोळ्यांवर माझे प्रेम आहे. आणि त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर माझे प्रेम आहे."
32) तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले, "डोळे हे अश्रूंचे घर आहे. नाक हे घाणीचे घर आहे, तोंड हे थूंकीचे घर आहे, कान हेही मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्राचे आगर आहे, हे तुला माहीत आहे काय?"
33) "मुली, आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे, हे मला कळत नाही."
34) मुलगी विचार करु लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे सांगितले.
35) भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली, "अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते. आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे. माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्यावर सुरक्षित पोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे. निराश्रित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाली आहे. आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे. भगवन्तानी आपल्या सदुपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे."
36) "प्रकृती, तू भाग्यवान आहेस; कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री-पुरुषांपुढील आदर्श आहेस. तू हीन जातीची आहेस पण ब्राम्हणही तुझ्यापासून धडा घेतील. न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरुन तू ढळू नकोस म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्यापुढे फिक्या पडतील."
37) विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्खुणींच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्यापुढे होता.
38) त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती सर्वात खालचा मानला गेलेल्या समाजातील होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला.
*


*************************
For English: see the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग आठवा- पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा
१. एका उडाणटप्पूची धम्मदीक्षा
*********************
No comments:
Post a Comment