पोस्ट नं 106

📚 पोस्ट नं 106 📖
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy
🌷5. अनाथपिंडकाची धम्मदीक्षा (iii)🌷
Conversion of Anathapindika
*************************

17) आणि तथागत म्हणाले, "उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आंनद मिळतो. जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले. परंतु, जो संपत्तीला चिकटून राहात नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल."

18) "माझे तुम्हांला असे सांगणे आहे की, तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या कामात, व्यवसायात लक्ष द्या (diligence to thy enterprises). जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत; तर त्यांची आसक्ती व अभिलाषा त्यांना गुलाम करते."

19) "केवळ निष्क्रिय जिणे जगण्यासाठी जो भिक्खू संसारत्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण आळसाचे जिणे घृणास्पद होय; निष्क्रियतेचा व निरुत्साहीपणाचा तिरस्कारच केला पाहिजे."

20) "माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसारत्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसारत्याग करावा असे तथागताचा धम्म सांगत नाही.
माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, आपले चित्त शुद्ध करावे, सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे, असे तथागतांचा धम्म सांगतो."

21) "आणि लोक काहीही करोत; कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत, किंवा संसारत्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवोत, मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. पाण्यात वाढणा-या परंतु पाण्याचा स्पर्श न होणा-या कमळाप्रमाणे ते असतील; जीवनसंघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करत नसतील, आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर सत्यमार्गाचे जीवन जगत असतील, तर आंनद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील."

22) अनाथपिंडकाला सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट, साधे आणि शहाणपणाचे असल्याचे दिसून आले.

23) याप्रमाणे ख-या तत्त्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने तथागत बुद्धांच्या चरणाशी मस्तक नमविले, आणि हात जोडून त्याने त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली.

************************
For English: see the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*****************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
६. प्रसेनजित राजाची धम्मदीक्षा
*********************

No comments:

Post a Comment